Search

अस्सल भारतीय...

नेहमीप्रमाणे वस्तीत गेले. रोजच्या नियमानुसार सगळी कामं आटोपून चौकातल्या झाडाच्या पारावर बसलेल्या बायकांमध्ये जाऊन सामील झाले. जवळ जवळ सगळ्याच जणींच्या हातावर पूर्ण तळहातावर मावेल एवढी मिशरी. काहींची पूर्ण काळी होईपर्यंत भाजलेली तर काहींची अर्धवट भाजलेली. दात घासण्याचे काम तल्लीनतेने, आनंदाने चाललेलं ! त्यात माझी भर.

मी गेले. नेहमीप्रमाणे बायकांनी मागे पुढे सरकून मला जागा करुन दिली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि शेवटी मुळ विषयाला सुरुवात केली. आम्ही वस्तीत एक स्वयं सहाय्यता गट केला होता. दोन महिने झाले आमच्या गटाची मिटिंग होवू शकली नव्हती. त्यासंदर्भात बोलण्यासाठी आणि मिटींगची तारीख ठरवण्यासाठी मी वस्तीत गेले होते.

कुठल्याही वस्तीत कुठलेही काम सुरु करायचे असेल तर कष्ट सारखेच करावे लागतात. वस्तीतल्या बायकांना राजी करायला खूप वेळ लागतो. पण एकदा का राजी झाल्या किवा एकदा त्यांना तुमचा स्वभाव, कामाची पद्धत आवडली की त्या तुमच्यासाठी जीव द्यायलाही तयार होतात. या सगळ्या बायका मूळ विषय सोडून अवांतर गप्पा मारण्यात एकदम पटाईत असतात.

त्यांना मी सारखी विषयावर ओढून आणण्यासाठी सर्कस करीत होते. एकदाच्या सगळ्याच ‘मिटिंग’ या विषयावर बोलायला लागल्या. पाच सहा जणीच बसल्या होत्या तेवढ्यात आमची एक पुढारीन बाई लांबूनच बोलत, हसत आली.

“ताई, माझ्या बहिणीलाही आपल्या गटात यायचे आहे”

“मग येऊ दे ना”, माझ मत.

“पण ताई, ती अजून कामावरुन आलेली नाही.”

“किती वाजता येईल?”

“येईल पाच- सहा वाजता”

“येऊ दे, आज तीच फक्त नाव सांग. पुढच्या मिटींगला मात्र ती हजर राहील, एवढेच बघा.”

“चालेल, तीच नाव आहे रुक्साना अहमद शेख.”

मी नाव ऐकून न लिहीताच तिच्याकडे वरती बघितलं.

“लिहा ना ताई, रुक्साना अहमद शेख.”

मला ऐकूच आलं नाही अस समजून तीने तेच नाव मोठ्याने सांगितलं. मी तेच नाव मोठ्याने वाचत लिहीलं आणि आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे पाहीलं.

“ताई काय झालं? माझी सख्खी बहीण आहे ती! वेळेवर पैसे भरीन. पैसे भरायला ती लई पक्की आहे. धुणं भांड्याची कामं करती.”

“नाही, ठीक आहे. मला काही तुझ्या बहिणी बद्दल शंका नाही.”

“नाही तुम्ही थांबल्या म्हणून सांगतीया.”

मिटिंग संपली. माझ्या मनात अनेक प्रश्न. सर्व बायका आपापल्या घरी गेल्या. मला आमच्या या पुढारीन बाईशी बोलायचे होते म्हणून मी बायका जाण्याची वाट पहात होते. तेवढ्यात तीच आपणहून म्हणाली, “ताई, चला ना चहा घ्या.” मी घाईघाई उठले आणि तिच्या मागे चालायला लागले. “का हो, तुम्ही शेट्टी आणि तुमची बहीण शेख कशी काय?” खूप वेळ मनात घोळत असलेला प्रश्न विचारुन मी मोठा श्वास टाकला. आमची पुढारीन अगदी गोड हसली. तिच्या कृष्णवर्ण चेहऱ्यातल्या शुभ्र दातांमुळे तीच हसण जरा जास्तच लक्षात आलं.

“तिला मुसलमान आवडला म्हणून त्यांच्याशी लग्न केलं. मला मद्रासी आवडला म्हणून मी शेट्टी. माझ्या लहान बहीणीने महार पोराशी लग्न केलं म्हणून ती कांबळे.” शेट्टी बाईंच कुटुंब ऐकून मी तर चाटच पडले. कुटुंबाची सविस्तर माहीती घ्यावी असच आता वाटायला लागलं..

“तुमची आई कुठे राहते?”

“इथेच. आपल्या वस्तीत.”

“कोण हो?”

“भेंडी जवळ जे छोटस खाऊ च दुकान आहे ना, तीच माझी आई, आदिवासी. ती एका माणसाच्या प्रेमात पडली तो महार होता. तिच्या आईबापाने पहिल्यांदा लग्नाला मान्यता दिली नाही. तिला मारलही पण माझ्या आईने ऐकलंच नाही म्हणून तीच लग्न मोठ्या थाटामाटात तिच्या आईबापाने करुन दिल. आम्ही तिघी बहीणी, आम्हांला वानवानचा एकच भाऊ त्याने मुस्लीम पोरीशी लग्न केलं. आमच्या एका लांबच्या भावाच आणि माझ्या मोठ्या बहीणीच लग्न झालं. माझा नवरा आमच्या वस्तीत एकटाच खोली घेऊन राहायचा. आमच प्रेम पडलं. मी घरात सांगितलं. तेव्हा माझा बाप खूप आजारी होता. त्यामुळे आईने लग्नाला काही संमती दिली नाही, पुढे माझा बा वारला, माझ्या आईने माझे लग्न आमच्या जातीत (साहजिकच महारात) ठरवलं. माझी तिथे लग्न करायची इच्छा नव्हती. मी खूप रडले. मग माझ्या नवऱ्याने डेअरिंग केलं आणि माझ्या आईला भेटला. त्याला मागेपुढे कोणी नव्हतं. जवळपास कोणीच नातेवाईक नव्हते. चारपाच वर्षांपासून तो इथेच आमच्या वस्तीत राहतो. तो कधी, कोणत्या नातेवाईकाकडेही गेला नाही. माझे लग्न त्याच्याशी केले नाही तर तो माझ लग्न दुसऱ्या कोणाशीही होऊ देणार नाही असा सर्वांसमोर दमच दिल्यामुळे एकदाची माझी आई आमच्या लग्नाला तयार झाली. आमच्या घरी खायचे वांदे. लग्नाचा खर्च कुठून करायचा? सगळी वस्ती एकत्र बसली. सगळ्या वस्तीने काम केलं. स्वतःच्या घराच कार्य समजून प्रत्येकाने घरातली भांडी, सामान, पैसे खर्च केले. आमचे लग्न अतिशय आनंदात, उत्साहात, थाटामाटात झालं. आता मला दोन मुल आहेत. आमच छानच चाललय. आपल्या (सगळ्या) वस्तीत तुम्ही फिरलात तर तुमच्या लक्षात येईल की, एकही घर अस नाही जिथं कुठलही ‘मिक्सिंग’ नाही. आपली गट प्रमुख आदिवासी आहे तिचा नवरा मराठा आहे. मी सगळ डोक्यात घेऊन शरीराने घरी आले परंतु माझ मन अजून वस्तीतच अशी ‘मिक्सिंग’ कुटुंब शोधत होतं. आपल्याकडे जातीचा एवढा कडवा आग्रह, त्यावरुन हाणामाऱ्या, माणसा माणसांमध्ये असलेला द्वेष असा वस्तीचा इतिहास एका बाजूला आणि जातीच्या भिंती पलीकडे आयुष्य जगणारी कुटुंब एका बाजूला. दोन्हीही सत्यच !

महात्मा फुल्यांनी अशी सर्वच जाती धर्मांची, सख्ख्या नात्यातल्या कुटुंबांची कल्पना शंभर दिडशे वर्षांपूर्वी मांडली होती. त्यावेळी ते अशक्य वाटत होत. पुढे अशी कुटुंब प्रत्यक्षात येण कठीण वाटू लागलं. आता मात्र त्यात अवघड काय आहे? असच वाटायला लागलं आहे. अशी कुटुंब म्हणजे समजा अंतर्गत अपेक्षित सरमिसळीची सुरुवातच आहे अस मला वाटतं. – अस्सल भारतीय

महात्मा फुल्यांनी अशी सर्वच जाती धर्मांची, सख्ख्या नात्यातल्या कुटुंबांची कल्पना शंभर दिडशे वर्षांपूर्वी मांडली होती. त्यावेळी ते अशक्य वाटत होत. पुढे अशी कुटुंब प्रत्यक्षात येण कठीण वाटू लागलं. आता मात्र त्यात अवघड काय आहे? असच वाटायला लागलं आहे. अशी कुटुंब म्हणजे समजा अंतर्गत अपेक्षित सरमिसळीची सुरुवातच आहे अस मला वाटतं.

29 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922