Search

चला मग मासिक पाळीबद्दलचा संकोच संपवूया...

आजचा दिवस जागतिक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. माहिती नाही किती लोकांना मासिक पाळी बद्दल किंवा या दिवसाबद्दल माहिती असेल किंवा असलं तरी ते किती मोकळयापणाने या विषयावर बोलतात. काही असतील ही लोक आहे की ते या विषयावर खुप छान बोलतात पण स्वतःच्या आयुष्यात त्याच आचरण करत नाही. असो...


गेल्या 3 वर्षापासून संगिनी महिला जागृती मंडळ, नाशिक मासिक पाळी हा विषय घेवून काम करते आहे, संगिनी खास करून हे काम मुला सोबत करते, कारण आमच म्हणणं आहे की मूलींना मासिक पाळी येते त्यामुळे त्यांना कळत नकळत त्याबद्दल माहिती होते, खर तर ति माहिती योग्य व पूर्णपणे नसते पण मूलभूत माहिती असते. संगिनीच्या टीमला वाटलं की प्रत्येक मुलाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने मुलगी येत असते तर मग मुलांना ही मासिक पाळीबद्दल माहिती असली पाहिजे.

संगिनीच्या संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता अनिता पगारे या जेव्हा महिला व मुलांकरिता सहाय्य कक्ष मध्ये काम करीत असतांना त्यांनी एक अभ्यास केला होता कि बऱ्यापैकी कौटुंबिक हिंसाचार हा मासिक पाळी च्या काळात होतो. कारण की पुरुषांना कळतच नाही की आपल्या बायकोचा मूड का? बदलतो, त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार होतो


संगिनीने गेल्या 3 वर्षापासून नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये मासिक पाळीचे सत्र घेतली आहेत. तसेच गेल्या 2 वर्ष शितल पवार संगिनीची मासिक पाळी प्रकल्पाची प्रकल्प प्रमुख आहे, तिने नाशिक मधल्या 2 शाळासोबत एक वर्षभराच नियोजन केल होतं.

त्यात तिने स्व-ओळख, गुड टच बॅड टच, माझं आरोग्य माझं शरीर, बॉडी पार्टस ओळख, सामाजिक लिंग समभाव(जेंडर), व शेवटी मासिक पाळी अस वर्षभर नवरचना विद्यालय व सुखदेव विद्यालय या शाळामध्ये सत्र घेत आहे.

या वर्षभरात मुलांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला, शाळेच्या सर्वानी ही खुप छान सहकार्य केले व करत असतात. खुप बरं वाटत की जे आम्हाला आमच्या शाळेच्या वयात नाही मिळालं ते आम्ही पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करीत आहोत.


चला मग मासिक पाळी समजून घेऊया, आपल्या अस्तित्वाचे कारण समजून घेवून आणि एक चांगला माणूस बनवू या...


तुम्हीही आपापल्या घरात छोटे छोटे प्रयत्न करत रहा किंवा तुम्हाला शक्य नसेल तर आम्हाला तुमच्यासोबत व तुमच्या ग्रुप, फॅमिलीसोबत गप्पा मरायला किंवा सत्र घेईला नक्की आवडेल.




कल्याणी अनिता मनोहर

संगिनी महिला जागृती मंडळ, नाशिक

sangini.mk16@gmail.com







47 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922