Search

विनायकदादा पाटील याचं मनोगतपोर {वस्तीवरची पोरं}

काहींनी गरिबी ऐकलेली असते. काहींनी पाहिलेली असते. काहींनी गरिबी अनुभवलेली असते, तसेच दारिद्य वाट्याला येणाऱ्या लोकांचंही एक जग असत, त्यांचंही एक जगण असत. हे जगणं अनिता पगारेनं रिकाम्या पोटाने व भरल्या डोळ्याने पाहिलं आहे. ती झोपडपट्टीत जन्मली, झोपडपट्टीत वाढली, झोपडपट्टीत राहूनच शिकली, झोपडपट्टी राहूनच झोपडपट्टीच्या सुधारणेचे काम करीत आहे. जे पाहिलं, जे वाट्याला आलं, जे अनुभवलं तेच अनितानं लिहिलं. जगण्याच्या या संघर्षा पासून अनेक योजने दूर राहून सगळ ठीक-ठाक चाललं आहे, असं समजणाऱ्यांना ‘वस्तीवरची पोरं’च्या निमित्ताने कळू देत की, जगणं असंही असत आणि ते आपल्यापासून फार दूर नसतं...

- विनायक पाटील , नाशिक

www.sanginimk.com

19 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922