Search

"तरुण माझा भाऊ"

Updated: Feb 1


तरुण माझा भाऊ, नको व्यसना आहेरी जाऊ.

तुझ जिवन आहे खूप अमूल्य, अन टिकाऊ.

आहेस एकुलता एक म्हणून नको गर्वात राहू.

बदल घडवायला ये पुढे, हात तुला आम्ही देऊ.

तरूण माझा भाऊ, नको हाताने जिवन गमावू.

डोक्यामध्ये कुठल्या प्रकारचा, कचरा नको ठेऊ.


हिंमत राखून सर्व बांधवांना, पुढे आपन नेऊ.

तरुण माझा भाऊ, नको हाताने जिवन गमावू.

स्वताच्या जिवाचा कोंडमारा, नको करून घेऊ.

काय आहे तुझ्या मनात, नको ते लपवू.

तरुण माझा भाऊ, नको हाताने जिवन गमावू.

तत्पर तुझ्या मदतीला, आम्ही सगळे राहू.

तू पुढे तर ये, काही तरी करून पाहू.

तरुण माझा भाऊ, नको हाताने जिवन गमावू.

तुला पडलेल्या प्रश्नांवर उत्तर आम्ही देऊ.

विश्वास तर ठेव एकदा, नकोस तू भिऊ.

तरुण माझा भाऊ, नको हाताने जिवन गमावू.


किरण कांबळे.

8 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922