Search

Ye Jawani Hai Diwani # 01

Updated: Jan 17


ये जवानी, है दिवानी...

आपलं 22 सावं शतक 21 व्या वर्षात म्हणजेच ऐन जवानीत प्रवेश करतं आहे आणि त्यानिमित्ताने मला संगिनीच्या तरुण (मनानेपण ) वाचकांशी संवाद साधायला मिळतोय, ही लई भारी गोष्ट आहे. एक टाइमपास लेखक म्हणून मी लै म्हणजे लै खुश आहे. आणि या खुद- खुशीत नवीन वर्षातलं पहिलं लिखाण आपल्या सर्वांच्या मनातल्या त्या ‘जवानीला’ समर्पित करतो आणि टाइमपासला सुरुवात करतो.


जवानी.. तारुण्य, शरीराची आणि मनाची एक अशी अवस्था जिची वाट बघत आपण हायस्कूलचे दिवस उत्साहात घालवतो आणि तिच्या रम्य आठवणींत उतारवय मजेत जगतो. तर अशी ही जवानी नावाची आयटम म्हटलं तर आपल्या मिठीतली मैत्रीण होऊ शकते, डायरीच्या पानांत जपून ठेवावं असं मोरपीस होऊ शकते नाहीतर वादळी पावसातली बिजली पण होऊ शकते. अशा या इंटरेस्टिंग जवानीची पहिली चाहूल साधारण 10 व्या 12 व्या वर्षी आपल्याला होते, जेव्हा घरातली मोठी माणसं “एवढा मोठा घोडा / घोडी झालीस तरी..” या वाक्याने सुरुवात करून आपल्याला अक्कल शिकवू लागतात तेव्हा.. घोडा याचा अर्थ मोठा असा घेऊन मी इयत्ता सहावीत असताना आमच्या वर्गातल्या निळे डोळे असणाऱ्या एका घोडीला (सॉरी सॉरी मुलीला ) ओघळत्या लाल रंगाच्या ब्रशने I love you लिहिलेली चिठ्ठी दिली होती. ती चिठ्ठी खेळाच्या सरांच्या हातात नेमकी कोणी दिली माहीत नाही पण लाल रंगाचे ओघळ अंगावरून वाहतील इतकी धुलाई झाल्याचं मात्र नक्की आठवतंय. पुढे 2 मुलांची आई झाल्यानंतर जेव्हा ते निळे डोळे पुनः भेटले तेंव्हा समजलं की तिला पण आठ दिवस घरात कोंडून ठेवलं गेलं होतं. आणि देवा समोरच्या दिव्यावर हात धरून ‘आपल्याला कोणी लव्ह लेटर लिहावे असे मी इथून पुढे वागणार नाही’, असं वदवून घेतलं होतं. तळहातावरचा चटका काही दिवसांनी बरा झाला असावा पण त्या कोवळ्या वयात मनाला मात्र आयुष्यभरासाठी चटका लागून गेला. त्यावेळी पालक आणि शिक्षकांनी (खरंतर जो भेटेल त्याने ) आम्हा दोघांनाही हेच ओरडून ओरडून सांगितलं की, “ अजून तुम्ही इतके मोठे झालेला नाहीत.” तिचा चटका आणि माझा फटका, आम्हाला सतत आठवण करून देत राहिला की अजून आपण ‘मोठे’ झालेलो नाही. आणि या उलट शरीर मात्र रोज मोठं मोठं हॉट होतं. त्यामुळे ‘आपण अजून लहान आहोत की मोठे झालोय ?’ या कन्फ्युजन मध्ये आम्ही कधी त्या खऱ्या जवानीच्या उंबरठयावर येऊन पोहचलो समजलंच नाही. मन आणि फाटक्या चटक्याचे संस्कार सांगायचे की आसपासच्या सगळ्या मुलींना बहीण मानावे पण पॅन्टच्या आत नव्याने सुरू झालेली हालचाल मात्र वेगळंच काहीतरी सुचवू पहात होती. मन बरोबर आहे की शरीर ? काहीच समजत नसण्याचा तो काळ फारच भंगार होता. राखी पौर्णिमा आणि भाऊबीजेला कुठेतरी गायब होत हा गोंधळाचा काळ मी कसा पार केला , माझं मलाच माहीत. कॉलेजला असताना सिगरेट फुकणाऱ्या पोरांना पोरी लवकर पटतात, असा पण माझा समज होता. सीनियर मित्र सिगरेट फुकायचे आणि हॉल्सच्या दोन गोळ्या घ्यायचे. एक स्वत: खायचे आणि एक मला द्यायचे. कीस करताना तोंडाला सिगरेटचा वास यायला नको म्हणून हॉल्स खायची असते. हा yz फंडा त्यांच्यापैकीच कोणीतरी माझ्या चटके फटके संस्कारित मनात कोणीतरी घुसवला होता. अर्धवट माहिती असलेल्या, घाबरत मनात असल्या कितीतरी गोष्टी उगाच भरल्या गेल्या. कीस करायला एकही मुलगी आयुष्यात नसताना मी मात्र कित्येक वर्ष उगाच हॉल्स चघळत राहिलो. पुढे कोणीतरी सांगितलं की जास्त हॉल्स खाल्ल्याने ‘उठत नाही’ (नपुंसकत्व येतं) कीस करायला नाही मिळालं तरी चालेल पण हा वैताग नको म्हणून घसा खवखवला तरी मी कधी हॉल्सच्या गोळी कडे बघितलं नाही.


तात्पर्य काय ? तर जवानी नावाच्या त्या मायावी टापू पर्यन्त येता येता आपण सगळेच (मुलं, मुली आणि ट्रान्सजेंडर पण ) खूप कन्फ्युज्ड असतो. आपल्या अडाणीपणा सोबतच संस्कृति, समाज, संस्कार हे फॅक्टर्स पण आपल्यावर जोरदार प्रेशर मारत असतात. आणि अशाप्रकारे पुरेशी तयारी नसताना जर आपण त्या जवानीला मिठीत घ्यायला गेलो तर ती बिजली होऊन आपल्याला जाळून टाकेल. आणि मग ते करपलेलं मनाचं मढं घेऊन आपण आयुष्यभर पुनर्जन्माच्या शोधात भटकत राहतो. फ्रेंडस! ही परिस्थिति आपण एका फटक्यात बदलू शकत नाही हे खरंय. पण वयात येताना मनातलं मोकळेपणाने बोलायला कोणीतरी असलं तरी यातले बरेचसे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला एक अशी हक्काची मोकळी जागा पाहिजे की जिथे आपण कितीही बेसिक प्रश्न विचारला तरी आपल्याला कोणी हसणार नाही. संगिनी टिमचं हे पोर्टल ही एक अशीच मोकळी जागा आहे जिथे आपल्याला अनुभव शेअर करता येतील, सिनीयर्सचे किस्से वाचायला मिळतील, प्रश्न विचारता येतील आणि मुख्य म्हणजे त्यावरून आपल्याला कोणीही जज करणार नाही. ‘ये जवानी है दिवानी’ या आपल्या सिरिज मध्ये अशाच ‘न बोलल्या जाणाऱ्या पण महत्वाच्या’ विषयांवर आपण बोलणार आहोत. तेव्हा मित्र मैत्रिणींनो हात पसरून तयार रहा आपल्या जवानीला मिठीत घ्यायला :-)


- योगेश गायकवाड

38 views0 comments
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922