Search

Ye Jawani Hhai Diwani # 02

‘ये जवानी है दीवानी’ या वाक्याकडे आज वयाच्या चाळीशीत मी वेगळ्या दृष्टीने बघतोय. पण माझ्या पंचवीशीत अर्थातच या वाक्याकडे बघण्याची माझी दृष्टी वेगळी होती. खरंतर त्यावेळी असा विचार बिचार करण्या इतका वेळच नव्हता. जवानीच्या जोशात मी पण फक्त ते दिवस अनुभवत गेलो. मला न आवडणाऱ्या, न जमणाऱ्या अनेक गोष्टी फक्त सगळे करतात म्हणून मी करत गेलो. तेव्हा पण समजत होतं की हा च्युत्यापा आपण नको करायला. पण एकटे पडण्याची भीती वाटायची. गर्दीला फाट्यावर मारून स्वत:ला हवं तसं जगण्याची हिंमत तेव्हा नव्हती. ती हिम्मत देणारं कोणी भेटलं असतं तर जवानी अजून दीवानी झाली असती. माझ्या या लिखाणात कदाचित ती हिम्मत कुठेतरी सापडण्याची शक्यता आहे. आयतं सोल्यूशन नाही पण ‘मी मला पाहिजे तसं जगेन’ असा विचार मनात डोकावला असेल तर त्याला यातून ताकद नक्कीच मिळेल.


Let us start with ये जवानी है दिवानी. जवानी म्हणजे काय आणि दिवानी म्हणजे तरी काय ? तर जवानी म्हणजे स्वत:ची बाइक, जावेद हबीबच्या महागड्या सलून मधला हेअरकट, चौकोनी फ्रेमचा गॉगल आणि कबीर सिंग सारखा attitude. आणि या सगळ्यावर लट्टू होऊन आपल्या बाईकवर मागे बसून फिरायला पटलेली आयटम पोरगी म्हणजे ‘दिवानी’. थोड्याफार फरकाने बहुतेक तरुणांच्या कल्पना या अशाच असतात. माझ्यापण होत्या. (फक्त आमच्या वेळी कबीर सिंग नव्हता तर त्याच्या जागी डर मधला शाहरुख खान होता ;-) मुव्ही मधला हीरो जसा असतो, तसं असणं म्हणजे जवानी, असं वाटणं अगदी साहजिक आहे. त्याच्यासारखी मागचं सीट थोडं उंच असलेली बाइक आपल्या कडे पण असावी. ( जीच्यावरून फिरताना गपकन ब्रेक मारला की मागे बसलेली आयटम पुढे घसरते, आधारासाठी आपल्याला चिपकते आणि आपल्याला हवा असलेला ‘तो’ स्पर्श मिळतो. ) असं प्रत्येकालाच वाटतं. कबीर सिंग सारखं पोरींना ‘हाड हुड’ केलं की त्या जास्त attract होतात, असाही समज असतो. पण ज्यांना ही सगळं जमतं, परवडतं त्यांचं कसं बसं निभावून जातं. पण माझ्यासारख्या सामान्य घरातल्या तरुणाची मात्र सॉलिड गोची होते. इतर मुलं बाईक वर पोरी फिरवत असताना आपण मात्र बसने यायची लाज वाटू लागते. म्हणून मग काहीजण कॉलेज जवळच्या बस स्टॉप वर न उतरता एक स्टॉप अलीकडे उतरून बाइक पार्किंग मधून किल्ली फिरवत फिरवत येतात. जावेद हबिबची फ्रानचायजी असलेल्या सलून मध्ये केस कापायला मिळावेत म्हणून बापाकडे ७०० रुपये मागितले तर रात्री जेवायला पण जावेद भाई कडे जायला लागेल. मग अशावेळी आपल्यापैकी बरेचजण गल्लीतल्या केशकर्तनलयात हेअर कट करतात आणि जावेद हबीबच्या सलून बाहेर सेल्फी काढून फक्त fb वर पोस्ट करतात. रणवीर किंवा टायगर श्रॉफ सारखे कपडे घ्यायला मॉल मध्ये गेलो तर प्राइज टॅग बघूनच आपली हवा जाते. म्हणून मग आपण ट्रायल रूम मध्ये जाऊन ते कपडे ट्राय करतो, सेल्फी काढतो, fb वर पोस्ट करतो आणि कपडे परत ठेवून देतो. या सगळ्याचं इंप्रेशन पडून एखादी पोरगी पटलीच तर मग आपल्यात कबीर सिंग संचारतो आणि आपण तिच्या वर मालकी हक्क गाजवायला लागतो. ही नाटकं थोडे दिवस चालतात पण मग आपलाच कोणीतरी मित्र आपलीच मारतो आणि ग्रुप समोर सांगून टाकतो की आपल्याकडे बाईक नसून आपण बसचे धक्के खात कॉलेजला येतो म्हणून.. मग सुरुवात होते घरच्यांना पटवायची. बस लवकर मिळत नाही. लेक्चरला उशीर होतो, क्लासला पण जावं लागतं, दुनियाभरचे प्रॉब्लेम्स मग आपण घरी सांगू लागतो आणि अखेर वडील गाडी घ्यायला हो म्हणतात. पण त्यांच्या बजेट मध्ये असलेली सेकंड हँड स्कूटर आपल्या शान के खिलाफ असते. मग आपण आईला ब्लॅक मेल करून करून वडिलांना कर्ज काढून बाइक घ्यायला भाग पाडतो. आईने तांदळाच्या डब्यात साठवलेले पैसे प्रोजेक्ट साठी म्हणून घेतो आणि gf सोबत मुव्हीला जातो. त्यात रणवीरच्या एका जॅकेटवर ती फिदा झालेली बघून आपल्याला पण तसंच जॅकेट हवं हवसं वाटू लागतं. पण बाईकचे हप्ते भरणारा बाप ४ हजारचे जॅकेट घेऊन देणं अशक्य असतं. म्हणून मग आपण लाइट बील भरायला दिलेले पैसे गायब करून ते जॅकेट विकत घेतो. खराब न करता दोन दिवस मिरवून तिच्यावर इंप्रेशन मारतो. आणि तिसऱ्या दिवशी साईज बरोबर नाही म्हणून ‘रिटर्न पॉलिसी’ मध्ये परत करतो. असा हा सगळा झोल झपाट आपण का करतो? तर जवानी म्हणजे मुव्ही मधल्या हीरो सारखं दिसणं, असा आपला समज असतो. मुलींना तसंच आवडतं, असं आपल्याला वाटत असतं. पण रियालिटी मात्र फार वेगळी असते, हे भेजात शिरे पर्यन्त जवानी पार नासून जाते. खरंतर मुलींना मुलांच्या मधला कॉन्फिडन्स जास्त attract करतो. तो बसने येतो पण त्यात त्याला काहीही कमीपणा वाटत नाही. उलट पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं ही काळाची गरज आहे, असं तो ठामपणे सांगतो. गर्दीत एखादे म्हातारे आजोबा उभे असतील तर तो आपली सीट त्यांना ऑफर करतो. त्याचा शर्ट आठवड्यातून दोनदा रिपीट होतो पण तो कपडे मस्त कॅरी करतो. Bf म्हणून त्याला आवडतात तसेच कपडे Gf ने घालावेत, इतर मित्रांशी उगाच टाळ्या देऊन बोललेलं मला चालणार नाही, असा मालकी हक्क गाजवण्यापेक्षा ती जशी आहे तशी तो accept करतो. तिला समानतेची वागणूक देतो. रिसपेक्ट देतो. हॉटेलचं बील तिने दिलं तर त्याला अपमान वाटत नाही. या गोष्टी पोरींना जास्त आवडतात. जी बाईक वर फिदा होऊन तुमच्या मागे बसते ती कारवाला भेटला की तुमच्या गाडीवर लाथ मारून निघून जाते. जी जॅकेटवर फिदा होऊन तुमच्या बरोबर फिरते ती जॅकेट मधून मसक्युलर बॉडी दाखवणारा भेटला की त्याल चिपकते. यावर उपाय एकच, आपण जसे आहोत तसेच राहणे. सिनेमा बघून दीखाऊपणा करायला जाऊ नये. कारण रणवीर सिंग पण शूटिंग संपल्यावर ते टाईट कपडे काढून ठेवतो आणि स्वत: चे कंफरटेबल कपडे घालूनच दीपीला भेटायला जातो. शाहीद कपूर पण पोरींशी अत्यंत रिसपेक्टने बोलतो म्हणूनच तो पोरींमध्ये इतका फेमस आहे. थोडक्यात काय तर जवानी म्हणजे दुसऱ्या सारखं दिसण्यात एनर्जी वाया न घालवता, स्वत: ला स्वत: सारखं ठेवत, त्या सोनेरी दिवसांची मजा घ्यायची. अशी जवानी जगून तर बघा, आपल्या सारखीच स्वत:चा रीसपेक्ट करणारी ‘दिवानी’ आपल्याला पण नक्की भेटेल आणि खऱ्या अर्थाने जवानी दिवानी होऊन जाईल.


-योगेश गायकवाड

Yogmh15@gmail.com


130 views1 comment
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922